Join us

"...आणि इथेच या मैत्रीची सुरुवात झाली", अश्विनी महांगडेची मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

By तेजल गावडे | Updated: February 28, 2025 14:40 IST

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर मैत्रिणीसोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अश्विनी महांगडे ( Ashwini Mahangade)  मालिकेत सध्या काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या गावी गेलेली होती. तिथे शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर आता तिने तिच्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्ताने पोस्ट शेअर केली आहे.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर मैत्रिणीसोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, श्री…….प्रत्येक मैत्रीचा त्याचा त्याचा एक वेगळा प्रवास असतो. तसा आपला प्रवास हा एका घटनेमुळे सुरू झाला आणि आतासुद्धा तू मला सोडायला असलेली त्यावेळचे #गेट आठवले. ते पार करायचे की नाही हा तुझा प्रश्न असताना तू ते गेट माझ्यासाठी पार केलेस आणि इथेच या मैत्रीची सुरुवात झाली.. आपण रोज भेटत नाही आणि तासनतास गप्पा सुद्धा मारत नाही पण आठवणीने किमान काही महिन्यांनी भेटायचे, नाटक, चित्रपट, मालिका याविषयी बोलायचे हे आपण सुरू ठेवले हे चांगले आहे.. बाकी कामाची चर्चा , विचारांची देवाणघेवाण होणे याच्यापलीकडे तू कमाल माणूस आहेस, स्पष्ट बोलणारी आहेस याची मला मदतच होत असते.. मी कायम तुझ्यासोबत आहे..वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री…

वर्कफ्रंट आई कुठे काय करते मालिकेनंतर आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती गडगर्जना नाटकात काम करते आहे. यात तिने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे. या नाटकात स्तवन शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता निखिल चव्हाण निवेदकाची भूमिका बजावत आहे. नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत वैभव सातपुते झळकणार आहे.

टॅग्स :अश्विनी महांगडे