Join us

अँड शोज टॉपर इज

By admin | Updated: February 20, 2016 02:18 IST

कॅटरिना, ऐश्वर्या, प्रियंका, सोनाक्षी, जॅकलीन या सर्व ग्लॉमरस बी टाऊन गर्ल्सना मोठ्या मोठ्या ब्रॅण्डसाठी रॅम्पवर स्वत:चे जलवे विखुरताना प्रेक्षकांनी पाहिले आहे

कॅटरिना, ऐश्वर्या, प्रियंका, सोनाक्षी, जॅकलीन या सर्व ग्लॉमरस बी टाऊन गर्ल्सना मोठ्या मोठ्या ब्रॅण्डसाठी रॅम्पवर स्वत:चे जलवे विखुरताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. एकदा तरी मोठ्या ब्रॅण्डसाठी रॅम्प वॉक करण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्रीचे असते. असेच स्वप्न आपली अप्सरा म्हणजेच सोनालीचेदेखील होते. मग काय़़़ झाले ना तिचे स्वप्न पूर्ण. अहो, तिने मेकिंग इंडियाच्या एका इव्हेंटमध्ये नीता लुला या फेमस डिझायनरने डिझाइन केलेला इथनिक ड्रेस परिधान केला होता. ती या फॅशन शोची शोज टॉपर होती. तिने मराठमोळ्या अंदाजामध्ये पैठणीपासून बनलेला लाल रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता व त्यात तिने नाकात मोत्यांची नथनी घातली होती. अशा सुंदर मराठमोळ्या अप्सरेने रॅम्प वॉक करून सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली असतील, हे नक्कीच.