Join us

...अन् कमल हसन थोडक्यात बचावले

By admin | Updated: April 8, 2017 10:05 IST

हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हसन निवासस्थानी लागलेल्या आगीतून थोडक्यात बचावला.

ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 8 - हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हसन निवासस्थानी लागलेल्या आगीतून थोडक्यात बचावले. शनिवारी पहाटेच्या सुमारास कमल हसन यांच्या घरात आग लागली होती. स्वत: कमल हसन यांनी टि्वटकरुन या घटनेची माहिती दिली. आग लागली त्यावेळी कमल हसन तिस-या मजल्यावरील रुममध्ये होते. त्याच्या बंगल्यात काम करणा-या कर्मचा-यांच्या  मदतीने ते खाली उतरले. 
 
टि्वटरवरुन या घटनेची माहिती देताना कमल हसन यांनी आपल्या स्टाफचे आभार मानले आहेत. फुप्फुसांमध्ये धूर जमा झाला आहे पण मी सुरक्षित असून कुठलीही जिवीतहानी झालेली नाही असे त्याने सांगितले. कमल हसन यांनी त्यांच्यावर  प्रेम करणा-या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. 
 
कमल हसन सध्या त्यांचे मोठे बंधु चंद्रहसन यांच्या निधनाच्या दुखात आहे. मार्च महिन्यात त्यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने लंडनमध्ये निधन झाले. चंद्रहसन यांच्या निधनानंतर कमल हसन यांनी टि्वटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  चंद्रहसन चांगेल मित्र, शिक्षक होते. भाऊच नव्हे तर ते माझ्यासाठी वडिलासमान होते. त्यांच्यामुळे मी आयुष्यात यश मिळवू शकलो. त्यांनी माझ्यासाठी जी स्वप्ने बघितली त्यातली मी अजून निम्मी स्वप्नेही पूर्ण करु शकलेलो नाही असे कमल हसन यांनी टि्वट केले होते.