सुरेश वाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांच्या पत्नी पद्मा यादेखील क्लासिकल सिंगर आहेत. सुरेश वाडकर आणि त्यांच्या पत्नीनंतर आता त्यांची मुलगी अनन्या हीदेखील या क्षेत्रात येण्यासाठी सज्ज झाली आहे. सरगम हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून त्यात अनेक नवीन गायकांना संधी देण्यात येते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक, संगीतकार आपली गाजलेली मराठी चित्रपटातील, अल्बममधील गाणी सादर करतात आणि त्यानंतर ते नव्या टॅलेंटला लोकांसमोर आणण्यासाठी नवीन मुलांसोबत गाणी गातात. आता या कार्यक्रमात सुरेश वाडकर येणार असून ते त्यांची गाजलेली अनेक गाणी गाणार आहेत आणि त्यानंतर नवीन टॅलेंट म्हणून त्यांच्या आजीवासनमधील दोन शिष्यांसोबत गाणार आहेत आणि त्यातील एक शिष्या दुसरी कोणीही नसून सुरेश वाडकर यांची मोठी मुलगी अनन्या आहे. अनन्या पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही शोमध्ये दिसणार आहे, असे समजते आहे.
अनन्या वाडकर गाणार ‘सरगम’ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:02 IST