Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंबानींचं लग्न म्हणजे सर्कस! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यावर स्टारकिडची टीका, म्हणते- "मलाही बोलवलेलं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:55 IST

अंबानींच्या सोहळ्याचं आमंत्रण असूनही एक स्टारकिड मात्र अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शनला गेली नाही. उलट अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावर आता या स्टारकिडने टिकाही केली आहे. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे. या ग्रँड वेडिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्री वेडिंग, संगीत सेरेमनीनंतर आता अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतंच या दोघांचा हळदी समारंभ पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण, अंबानींच्या सोहळ्याचं आमंत्रण असूनही एक स्टारकिड मात्र अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शनला गेली नाही. उलट अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावर आता या स्टारकिडने टिकाही केली आहे. 

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप लोकप्रिय स्टारकिड आहे. आलिया एक सोशल इन्फ्लुएन्सर आहे. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी अंबानींच्या वेडिंग सोहळ्यातील फोटो शेअर करत असताना दुसरीकडे मात्र आलियाने याला "सर्कस" म्हटलं आहे. आलियाच्या ब्रॉडकास्ट चॅनेलचे काही चॅट्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिने अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावर टीका केली आहे. "अंबानींचा वेडिंग सोहळा हा सोहळा राहिला नसून आता एक सर्कस झाली आहे...मी हे सर्व एन्जॉय करत आहे", असं या चॅट्समध्ये तिने म्हटलं आहे. 

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या वेडिंग सोहळ्याचं आमंत्रण असल्याचंही तिने यामध्ये म्हटलं आहे. "मला देखील या सोहळ्याचं आमंत्रण मिळालं होतं. पण, मी याला नकार दिला. कारण, एखाद्याचं लग्न प्रमोट करण्यासाठी मी आत्मसन्मान विकणार नाही. हे म्हणजे असं झालं आहे की आपल्याकडे पैसे आहेत. त्याचं आपण काय करणार आहोत...मग चला जस्टिन बिबरला बोलवुया..." असं या चॅट्समध्ये तिने म्हटलं आहे. तिचे हे चॅट्स व्हायरल झाले आहेत. 

दरम्यान, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा अनंत अंबानी हा धाकटा लेक आहे. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. आता १२ जुलैला  ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तर १३ जुलैला त्यांचा आशीर्वाद सेरेमनी आणि १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन असणार आहे.  

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानीसेलिब्रेटी वेडिंगअनुराग कश्यप