Join us

अन शाहिद- मीराच्या मुलीचं नाव आहे...

By admin | Updated: September 19, 2016 13:35 IST

अभिनेता शाहिद कपूर व मीरा राजपूत यांनी त्यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन त्यांच्या चिमुकलीचे नाव 'मिशा' ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय पण तितकाच उत्तम अभिनेता असलेला शाहिद कपूर व पत्नी मीरा यांना गेल्या महिन्यात (२६ ऑगस्ट) 'कन्यारत्ना'चा लाभ झाला. त्यांच्या या गोड बातमीमुळे चित्रपटसृष्टीतील सर्वांनीच त्यांचे अभिनंदन करत नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र शाहिद- मीराच्या या चिमुकलीचे नाव काय असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती, त्यांचे चाहतेही तिचे नाव जाणून घेण्यास आणि तिची पहिली झलक पाहण्यास अधीर झाले आहेत. आपल्या या गोंडस चिमुकलीला 'लाईमलाइट'पासून दूर ठेवण्यास शाहिद अद्याप यशस्वी झाला असून त्याने तिचा एकही फोटो शेअर केलेला नाही. मात्र आज सोशल मीडियावरून त्याने तिचे नाव जाहीर केले आहे. तिचे नाव आहे 'मिशा' कपूर.. मीरा आणि शाहिद यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन हे नाव ठेवण्यात आले आहे. यापूर्वी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन त्यांच्या मुलीचे नाव ' आदिरा' असे ठेवले होते. 
ट्विटरवरून शाहिदने तिच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ७ जुलै रोजी मीरा राजपूत आणि शाहिद विवाहबद्ध झाले होते. 
(अभिनेता शाहिद कपूरला कन्यारत्न)
(शाहिद कपूर दिसणार नव्या लूकमध्ये)