Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमायरा दस्तूरच्या बिकनीतील फोटोने सोशल मीडियावर लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 06:00 IST

या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय.

अभिनेत्री अमायरा दस्तूर काही महिन्यांपूर्वी संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण अमायराच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. अमायरा सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या अमायराच्या फोटोने इंटरनेटवर आग लावली आहे. 

अमायराने तिचा बिकनीमधील फोटो थ्रो बॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोतील तिच्या हॉट अदांवर सध्या लाईक्सचा पाऊस पडतोय. तिचा बिकनीमधील हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावत आहे.

अमायराने बिकनीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधी देखील अनेकवेळा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर अमायरा चांगली अॅक्टिव्ह असते. अमायराने २०१३ मध्ये इश्क या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. अनेक तामिळ चित्रपटातही तिने काम केले आहे.

टॅग्स :अमायरा दस्तूर