Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री एमी जॅक्सनने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट!! पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 19:01 IST

अभिनेत्री एमी जॅक्सन हिचीे नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने तिच्या फॅन्सना ही पोस्ट शेअर करून चांगली बातमीच दिली आहे. ती या पोस्टमध्ये तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन हिचीे नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिने तिच्या फॅन्सना ही पोस्ट शेअर करून चांगली बातमीच दिली आहे. ती या पोस्टमध्ये तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. ती  १५ आठवड्यांची प्रेगनंन्ट असून तिने तिचा एक बूमरँग व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही पोस्ट पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच ती किती आनंदात आहे याचा विश्वा पटेल. तिने या पोस्टला ‘कमिंग सून?’ असे कॅप्शन दिले आहे. 

तिने काही दिवसांपूर्वीच ती प्रेगनंन्ट असल्याची बातमी तिच्या सोशल मीडिया फॅन्ससोबत शेअर केली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, ‘मी ही बातमी खरंतर घराच्या गच्चीवरून तुम्हाला ओरडून सांगणार होते आणि आज तो दिवस आला. मी आज जो खुलासा करणार आहे त्यासाठी मी आजचा दिवस योग्य मानते. मी आत्तापासूनच तुझ्यावर खूप प्रेम करू लागले आहे. एवढं की, मी इतर कुणावरही इतकं प्रेम करत नाही. हेच खरंतर सर्वांत प्रामाणिक प्रेम असू शकतं. मला तुला भेटण्याची खूप उत्सुकता आहे.’ तुम्हाला माहित आहेच की, एमीने नवीन वर्षांच्या संध्येला बॉयफ्रेड जॉर्जसोबत तिने साखरपुडा केला होता. त्यावेळी ती दोन महिन्यांची प्रेगनंन्ट होती. एमीने तिच्या साखरपुड्याविषयी फॅन्सना सोशल मीडियावर सांगितले होते की,‘१ जानेवारी २०१९ पासून माझ्या नव्या आयुष्याला सुरूवात होणार आहे. आय लव्ह यू...खूप खूप धन्यवाद की, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता.’

तिचे लग्न आता पुढच्या वर्षी २०२० मध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लग्न पुढे ढकलण्याचे कारणही थोडे आश्चर्यकारक आहे. लग्न करण्यासाठी सुंदर बीचच्या शोधात हे कपल आहे. जेव्हा दोघांना त्यांच्या आवडीनुसार बीच मिळेल तेव्हा ते लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत. जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लबही आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.

टॅग्स :एमी जॅक्सनप्रेग्नंसी