Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृता खानविलकर बनली ‘शो अँकर’

By admin | Updated: December 3, 2015 02:35 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, गायक बॉलीवूडच नाही, तर अगदी हॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यात यशस्वीदेखील

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, गायक बॉलीवूडच नाही, तर अगदी हॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्यात यशस्वीदेखील होत आहेत. श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या यादीत अमृता खानविलकरचे नावही आवर्जून घेतले जाते. कारण मराठी सिनेसृष्टीतल्या या नायिकेने आपल्या अदाकारीने हिंदी सिनेसृष्टीलाही नाचवले आहे. नच बलिये -७ पर्वामध्ये विजेतेपद पटकावून, अमृताने हिंदी सृष्टीत मराठीचा झेंडा रोवला आहे. सध्या चर्चेत असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाचा उल्लेख अशासाठी कारण या कार्यक्रमाची ‘शो अँकर’ अमृता खानविलकर होती. मुळातच हा सिनेमा मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा असल्याने, कार्यक्रमाची थीमही मराठमोळा होता. त्यामुळे सूत्रसंचालन करणाऱ्या अमृतानेही मराठी संस्कृतीला शोभेल, असा पेहराव केला होता.