Join us

अमोल कोल्हे यांनी केलं प्रविण तरडेंच्या पत्नीचं कौतुक; कारण...

By शर्वरी जोशी | Updated: March 24, 2022 20:34 IST

Amol Kolhe: राजकारण आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच त्यांनी डबिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अभिनय क्षेत्रापासून ते राजकीय क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचा दमदार ठसा उमटवला आहे. त्यामुळेच आज जनमाणसांमध्ये ते लोकप्रिय आहेत. राजकारण आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच त्यांनी डबिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'बाहुबली' या चित्रपटाच्या मराठी डबसाठी त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांच्या पत्नीचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांचं कौतुकही केलं आहे.

बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे चित्रपट अलिकडेच मराठीत डब करण्यात आले. हे दोन्ही चित्रपट शेमारु मराठीबाणा या वाहिनीवर प्रदर्शित झाले. त्यानिमित्ताने त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी डबिंग करतानाचा प्रवास, प्रविण तरडे आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या साथीविषयीदेखील भाष्य केलं आहे.

राजकीय अन् अभिनयक्षेत्र सोडून डॉ. अमोल कोल्हे यांनी केली नव्या क्षेत्रात एन्ट्री? पाहा काय म्हणाले...

"हा चित्रपट करताना खूप मज्जा आली. आणि, विशेषत: प्रविण तरडे यांच्या पत्नीचं कौतुक करेन. कारण, त्यांनी या चित्रपटाचं संपूर्ण मराठीकरण केलं आहे. त्यांनी कुठेही चित्रपटातील मूळ गाभ्याला धक्का न लावता ज्या क्षमतेने हे काम केलं हे वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी उत्तमरित्या हे काम केलं. इतंकच नाही तर चित्रपटाती प्रत्येक शब्दाविषयी त्या आग्रही होत्या. कोणता शब्द कशा पद्धतीचा हवा ये त्या वारंवार सांगायच्या. त्यामुळे त्यांच्यामुळे हे सहज शक्य झालं, असं अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे दोन्ही सिनेमे मराठीत डब केले गेले असून  दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी सांभाळली. तसंच या चित्रपटासाठी डॉ. अमोल कोल्हे,गश्मीर महाजनी,मेघना एरंडे,  सोनाली कुलकर्णी,  उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, या कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे.

टॅग्स :प्रवीण तरडेसेलिब्रिटीसिनेमाबाहुबली