दंगल चित्रपटात आमिर खानने महावीरसिंग फोगट या कुस्तीमधील वस्तादाची भूमिका साकारली आहे. आपल्या जीवनात आपली अम्मीच महावीरसिंग फोगट अर्थात मार्गदर्शक असल्याचे आमिर खानने स्पष्ट केले. तुझ्या जीवनातील महावीर फोगट कोण आहे? या प्रश्नावर ‘आपली आई अर्थात अम्मी हीच आपल्यासाठी महावीर फोगट आहे. आपण जे काही आहोत, जो मी विचार करतो, ते माझ्या आईमुळे,’ असे तो म्हणाला. लहानपणापासून त्याची विचारसरणी, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या आयुष्यावर त्याच्या अम्मीचा प्रभाव राहिला आहे.
‘अम्मी’च आहे आमिरची महावीर फोगट
By admin | Updated: December 23, 2016 02:35 IST