Join us

‘आँखे २’मध्ये अमिताभ साकारणार तरुण खलनायक!

By admin | Updated: February 25, 2017 02:51 IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लूकचा मेकओव्हर करण्यात येणार असून यात त्याची भूमिका तरुणपणाची असेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बझ्मी करणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारत असलेल्या भूमिकेसाठी तयारी चालविली आहे. या चित्रपटात बच्चन तरुण दाखवण्यात येणार आहे. अमिताभ यांच्या तरुणपणाचे फोटो पाहून तसा लूक मिळविता यावा यासाठी मेकअप आर्टीस्ट चांगलीच मेहनत घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अमिताभ साकारत असलेली भूमिका त्यांच्या हल्लीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत आगळी वेगळी असून विशेष म्हणजे ते खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय.