Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' नव्हे तर या कारणामुळे पुढे ढकलली 'इक्कीस'ची रिलीज डेट, अमिताभ बच्चन यांचा खुलासा, म्हणाले- "ज्योतिषाने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:29 IST

'धुरंधर'ची हवा बघता 'इक्कीस'ची रिलीज डेट बदलण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, यामागचं खरं कारण आता अमिताभ बच्चन यांनी सांगिलं आहे.

'धुरंधर'नंतर 'इक्कीस' हा देशभक्तीपर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत आहे. अगस्त्यने या सिनेमात एका सैनिकाची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा सुरुवातीला २५ डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र अचानका सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. आता 'इक्कीस' सिनेमा नव्या वर्षात रिलीज केला जाणार आहे. 'धुरंधर'ची हवा बघता 'इक्कीस'ची रिलीज डेट बदलण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, यामागचं खरं कारण आता अमिताभ बच्चन यांनी सांगिलं आहे. 

'इक्कीस' सिनेमाची रिलीज डेट धुरंधर मुळे नव्हे तर ज्योतिषामुळे पुढे ढकलली आहे. अमिताभ बच्चन यांनी Xवर 'इक्कीस'साठी पोस्ट केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'इक्कीस' सिनेमाची रिलीज डेट बदलण्याचं कारण सांगितलं आहे. "'इक्कीस' आधी पंचवीसला (२५) रिलीज होणार होती. आता सव्वीस (२६) एक(१) ला होईल. काही ज्योतिषांनी सांगितलं की चांगली वेळ आहे", असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

'इक्कीस' हा सिनेमा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे. या युद्धात २१ वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी शौर्य दाखवून परमवीर चक्र मिळवले होते. अरुण यांचं शौर्य आणि बलिदानाची कथा या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. तर सिनेमात अगस्त्य नंदा, अमिताभ बच्चन, जयदीप अहलावत, धर्मेंद्र यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : ' इक्कीस' release postponed: Amitabh Bachchan reveals astrological reasons.

Web Summary : Amitabh Bachchan revealed the film ' इक्कीस' release date was changed due to astrological advice, not 'Dhurandhar'. The film, based on the 1971 war, stars Agastya Nanda and Dharmendra, releasing January 26th.
टॅग्स :अमिताभ बच्चनसिनेमा