Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यात झाले आहे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण, हा घ्या पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 11:09 IST

अमिताभ यांचा बंगला तुम्ही अनेक चित्रपटात पाहिला आहे. अमिताभ यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देहृषिकेश मुखर्जी यांच्या चुपके चुपके या चित्रपटाला नुकतीच 46 वर्षे झाली. या फोटोत तुम्हाला जे घर पाहायला मिळतंय, ते एनसी सिप्पी यांचे आहे.

अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला आतून कसा आहे हे आपल्याला पाहायला मिळावे असे अनेकजणांना वाटत असते. अमिताभ यांच्यासारख्या सुपरस्टारचा बंगला म्हणजे तो अतिशय अवाढव्य असणार यात काहीच शंका नाही. त्यामुळे हा बंगला कसा आहे, या बंगल्याचा बगीचा कसा आहे याविषयी नेहमीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. पण हा बंगला आतून तुम्ही पाहिला आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का?

अमिताभ यांचा बंगला तुम्ही अनेक चित्रपटात पाहिला आहे. अमिताभ यांनीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले आहे. अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, हृषिकेश मुखर्जी यांच्या चुपके चुपके या चित्रपटाला नुकतीच 46 वर्षे झाली. या फोटोत तुम्हाला जे घर पाहायला मिळतंय, ते एनसी सिप्पी यांचे आहे. आम्ही हे घर घेतले... नंतर विकले... नंतर पुन्हा घेतले आणि पुन्हा चांगल्याप्रकारे बांधले. हे आमचे घर जलसा... 

त्यांनी पुढे लिहिले आहे की, आनंद, नमक हराम, चुपके चुपके, सत्ते पे सत्ता यांसारख्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या घरात झालेले आहे. 

अमिताभ यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून केवळ काहीच तासांत या पोस्टला सात लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सामान्यांसोबतच सेलिब्रेटीदेखील या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. शिल्पा शेट्टी, फरहान अख्तर, मनिष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रेटींनी फोटोवर कमेंट केली आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चन