Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांनी केले आहे चित्रपटात काम, हा घ्या पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 15:56 IST

अमिताभ यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनी देखील एका चित्रपटात काम केले आहे. 

ठळक मुद्देहरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या चित्रपटात केवळ एका सीनसाठी होते. यात त्यांना कोणता संवाद देखील नव्हता. केवळ मुलीचे कन्यादान ते दोघे करत आहेत असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. 

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन गेल्या पाच दशकापासून आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत आहेत. रोज काही ना काही नवीन रसिकांना काय देता येइल याच गोष्टीचा ध्यास त्यांना असतो. सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ यांचे दर्शन आजही रसिकांना घडत असते. अमिताभ यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अमिताभ यांच्याप्रमाणेच त्यांच्या आई-वडिलांनी देखील एका चित्रपटात काम केले आहे. 

अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला कभी कभी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाच्या सुरुवातीला अमित आणि पूजा यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण काही कारणांनी त्यांचे लग्न होत नाही असे चित्रपटात दाखवण्यात आले होते. पूजाचे लग्न दुसऱ्या मुलाशी होते. पूजाच्या लग्नाच्या दृश्यात आपल्याला हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी या चित्रपटात पूजाच्या आई-वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमितच्या भूमिकेत अमिताभ बच्चन तर पूजाच्या भूमिकेत राखी या अभिनेत्री होत्या.

हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन या चित्रपटात केवळ एका सीनसाठी होते. यात त्यांना कोणता संवाद देखील नव्हता. केवळ मुलीचे कन्यादान ते दोघे करत आहेत असे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. 

अमिताभ बच्चन यांचे असंख्य चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात अमिताभ यांचे फॅन्स पसरलेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. अमिताभ यांचेही ट्विटर, फेसबुकवर, इन्स्टाग्रावर अनेक फॅन्स आहेत. दिवसेंदिवस चाहत्यांच्या संख्येतही वाढ होत आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन