Join us

अमिताभ बच्चन यांनी दीपवीरला लग्नात दिला पैशांचा आहेर, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 16:44 IST

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे मुंबईत 1 डिसेंबरला झालेल्या रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब या पार्टीत हजर होते

ठळक मुद्दे जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधलेया एन्व्हलपमध्ये दुसरे तिसरे काही नसून पैसे असल्याचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलेयं

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे मुंबईत 1 डिसेंबरला झालेल्या रिसेप्शन पार्टीत संपूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण कुटुंब या पार्टीत हजर होते. बिग बी आणि रणवीर सिंग यांच्या डान्सचा व्हिडीओ देखील या पार्टीतला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.   

या पार्टी दरम्यान जया बच्चन यांच्या हातातल्या एक एन्व्हलपने सगळ्यांचे लक्ष वेधले. या एन्व्हलपने जया बच्चन यांनी नेमक काय आणले आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या एन्व्हलपमध्ये दुसरे तिसरे काही नसून पैसे असल्याचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केलेयं. बिग बीनी पैसे दिले म्हणजे नेमकं किती दिले असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला असल्याचे. तर अमिताभ यांनी 101 रुपयांचा आहेर दिल्याचा स्वत: खुलासा केला आहे. 101 रुपये देण्या मागचे कारण ही त्यांनी स्पष्ट केले आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या लग्नात ज्युनिअर आर्टिस्ट आणि मेकअप मॅन येण्यास संकोच करायचे, याच कारणास्तव बिग बीनी 101 रुपये भरण्याची सुरुवात केली. 

गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले. लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी दीपवीर दोघांनीही सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या सुरक्षेवर सुमारे १ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता.  

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंगअमिताभ बच्चन