Amitabh Bachchan Buys Land in Ayodhya :बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात पुन्हा एकदा मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. बच्चन यांनी अयोध्येत सुमारे २.६७ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत अंदाजे ३५ कोटी रुपये आहे. अयोध्येच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे बिग बींनी या पवित्र भूमीत तिसऱ्यांदा गुंतवणूक केली आहे.
रिअल इस्टेट कंपनी 'हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' (HOABL) ने दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार अमिताभ बच्चन यांच्या 'एबी कॉर्पोरेशन लिमिटेड' या कंपनीमार्फत करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. ही जमीन अभिनंदन लोढा यांच्या 'द सरयू' या ७५ एकरच्या लक्झरी प्रकल्पाजवळ आहे.
यापूर्वी जानेवारी २०२४ मध्येही अमिताभ बच्चन यांनी याच प्रकल्पात एक प्लॉट खरेदी केला होता. तसेच २०२५ मध्येही अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत २५ हजार चौरस फूटाचा प्लॉट खरेदी केला होता, ज्याची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याव्यतिरिक्त, त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ट्रस्टच्या नावावरही ५४,००० चौरस फूट जमिनीची नोंदणी आहे.
कंपनीचे अध्यक्ष अभिनंदन लोढा यांनी सांगितले की, अयोध्या सध्या जलद विकासाचा अनुभव घेत आहे. सरकारी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमुळे हे ठिकाण गुंतवणुकीसाठी देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. केवळ अयोध्याच नाही, तर अमिताभ बच्चन यांनी अलिबाग येथील 'सोल दे अलिबाग' प्रकल्पातही १०,००० चौरस फूट जागा खरेदी केली आहे.
Web Summary : Amitabh Bachchan invested in Ayodhya's real estate again, purchasing 2.67 acres for approximately ₹35 crores near Ram Janmabhoomi. This is his third investment in Ayodhya, following previous land acquisitions. He also invested in Alibaug.
Web Summary : अमिताभ बच्चन ने अयोध्या में राम जन्मभूमि के पास 2.67 एकड़ जमीन खरीदी, जिसकी कीमत लगभग ₹35 करोड़ है। यह अयोध्या में उनका तीसरा निवेश है। उन्होंने पहले भी जमीनें खरीदी थीं। इसके अतिरिक्त, उन्होंने अलीबाग में भी निवेश किया है।