Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप, एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 10:35 IST

एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते फक्त पोस्टच लिहितच नाही, तर चाहत्यांच्या प्रश्नांचेदेखील मजेशीर पद्धतीने उत्तरेसुद्धा देत असतात. तसेच ऑनलाईन ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओज, सुविचार, कविता ते शेअर करत असतात. मात्र, एका महिलेने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना त्याचे क्रेडिट दिले नाही, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टीशा अग्रवाल असे त्या महिलेचे नाव आहे. टीशा या कवियित्री आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलेली कविता टीशा यांनी २४ एप्रिल २०२० मध्ये लिहून फेसबुकवर पोस्ट केली होती. हीच कविता अमिताभ बच्चन यांनी २४ डिसेंबरला आपल्या ट्विटरच्या अकांऊटवरून शेअर केली आहे. हे लक्षात येताच टीशा अग्रवाल यांनी जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाहीत..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख.., अशा आशयाची पोस्ट केली आहे. 

एका न्यूज वेबसाइटशी बातचीत करताना टीशा यांनी सांंगितले की, मी ही कविता २४ एप्रिल, २०२०ला लिहिली होती. मी जेव्हा अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहिली तेव्हा मला असे वाटले की या ओळी मी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा मी चेक केले तेव्हा ही कविता माझीच होती. मी अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर कमेंट केली की कमीत कमी मला याचे क्रेडिट तर दिले पाहिजे. मला वाटले की त्यांचा पीआर हे प्रकरण बघेल पण मला वाटत नाही की यावर कोणी लक्ष दिले असेल. यासोबतच टीशाने सांगितले की काही लोकांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा सल्ला दिला आहे. ती पुढे काय करणार आहे, याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.

 तर टीशाच्या पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच अमिताभ बच्चन यावर काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनट्विटरइन्स्टाग्राम