ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी उत्सुकता लागून राहिलेल्या 'सरकार 3' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला आहे. जंजीर नंतर अँग्री यंग मॅन अशी ओळख निर्माण केलेल्या अमिताभ यांचा तोच अवतार पुन्हा एकदा 'सरकार 3' च्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. 'सरकार 3' हा सरकार सिरीजमधील चित्रपट असून राम गोपाल वर्मा यांनीच यावेळीही दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
2005 मध्ये 'सरकार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर राम गोपाल वर्मा यांनी 2008 मध्ये याचाच सिक्वेल 'सरकार राज' प्रदर्शित केला होता. या दोन्ही चित्रपटामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साकारलेली सुभाष नागरे (सरकार)ची भूमिका साकारली होती. आता 'सरकार 3' मध्येही अमिताभ बच्चन पुन्हा सुभाष नागरेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Amitabh Bachchan in and as SARKAR in SARKAR 3 Trailer.... May the POWER be with you... https://t.co/ZuUM8b0lJa— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 1, 2017
तब्बल आठ वर्षांनंतर सुपरहिट ‘सरकार’चा तिसरा पार्ट येतो आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासहित कलाकारांची फौज असून जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोनित रॉय, अमित साध, रोहिणी हट्टंगडी आणि यामी गौतम अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट येत्या 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.