Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैराट पाहून अामीर खान झाला निःशब्द

By admin | Updated: May 10, 2016 17:22 IST

उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने अभिनेता अामीर खानला वेड लावलं असून 'सैराट' पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्टही निःशब्द झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने अभिनेता अामीर खानला वेड लावलं असून सैराट चित्रपट पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्टही निःशब्द झाला आहे. आमीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ' नुकताच सैराट पाहिला. चित्रपट पाहून माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटातील शेवटाच्या धक्क्यातून मी अजून सावरतोय', असं आमीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तसेच त्याने चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख यांचेही कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे सैराटच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांसह झीचं अभिनंदन, असंही आमीरनेआपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे अद्यापही सैराट न पाहिलेल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचं आवाहन आमीरने ट्विटरवरून केलं आहे.
 
 

पहिल्या ८ दिवसात २५ कोटींचा गल्ला जमणाऱ्या सैराट चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेवर सिनेसृष्टीतील अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. बॉलिवूडमध्ये वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनुराग कश्यप यांनी सैराटचं कौतुक करताना म्हटलं आहे….

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सैराट पाहण्याची उत्सुकता ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अयुष्यमान खुराना यानेही सैराट सिनेमाची आणि त्यातील अजय-अतुलच्या गाण्यांची स्तुती केली आहे.

‘ओह माय गॉड’ सिनेमाची निर्माती अश्विनी यार्दी यांच्याकडूनही कौतुकाची थाप

मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखनेही नागराज आणि सैराटच्या टीमचं अभिनंदन केलं आहे.

‘रिंकू, काळजात घर केलं तू’ असे म्हणत अमृता खानविलकरने रिंकू राजगुरुची स्तुती आणि सैराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारेंनीही सैराटचं कौतुक केलं असून, ‘ब्रिलियंट’ हा एकच शब्द या सिनेमाला लागू होतो, असेही कोठारे म्हणाले.