Join us

आमीर, मी तुमची फॅन राहीनच - सनी

By admin | Updated: January 25, 2016 01:35 IST

सनी लिओन म्हणते, तिला आमीर खानसोबत काम करायला मिळो अथवा न मिळो, पण ती नेहमीच आमीर खानची चाहती राहील. वादग्रस्त मुलाखतीत आमीर खानने सनीची बाजू घेतल्याने ती त्याची फारच आभारी आहे

स नी लिओन म्हणते, तिला आमीर खानसोबत काम करायला मिळो अथवा न मिळो, पण ती नेहमीच आमीर खानची चाहती राहील. वादग्रस्त मुलाखतीत आमीर खानने सनीची बाजू घेतल्याने ती त्याची फारच आभारी आहे. ती म्हणाली, ‘आमीर खान मला म्हणाले, मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. मला तुझ्या भूतकाळाविषयी काहीच अडचण नाही.’ त्याच्या या बोलण्यावर सनी म्हणाली, ‘मला अजून खरे वाटत नाही की, ते मला असे म्हणाले आहेत. मी अजूनही शॉकमध्येच आहे. आम्ही सोबत काम करू अथवा न करू, पण ते नेहमीच माझे आदर्श राहतील.’