Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमीर आणि अमिताभ पहिल्यांदा एकत्र काम करणार

By admin | Updated: September 5, 2016 10:06 IST

अमिताभ बच्चन आणि आमीर खान लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी ‘ठग’ या सिनेमात झळकणार आहेत अशी माहिती मिळाली आहे

- ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 5 - बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार. दोघांनीही एकाहून एक सुपरहिट आणि सरस चित्रपट दिले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनी आजपर्यंत कधीही एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. पण लवकरच दोघेही एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आमीर खान लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी ‘ठग’ या सिनेमात झळकणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. 
 
अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपण आमीरसोबत चित्रपट करत असल्याच्या बातमीला दुजोरा दिलं असल्याचं सांगितल आहे. एका बेबसाईटला आमिताभ बच्चन यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सोबतच काही अटींमुळे आपण या चित्रपटाबद्दल जास्त काही बोलू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र आपण आमीरसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं ते बोलले आहेत. 
 
चित्रपटाचं नाव जरी 'ठग' सांगण्यात आलं असलं तरी हे नाव अजून नक्की झालेलं नाही. ‘धूम 3’ चा दिग्दर्शक विजय कृष्‍ण आचार्य ‘ठग’चं दिग्दर्शन करणार आहे. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट असेल.