Join us  

सनी देओल 'या' मुलीला मानतो लकी चार्म, जाणून घ्या देओलकुटुंबासाठी ती मुलगी कशी खास बनली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 11:02 AM

'या' मुलीनं सनी देओलचं बुडतं करिअर वाचवलं! अभिनेत्याने स्वतः खुलासा केला

'गदर' फेम बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे जगभर चाहते आहेत.  त्याच्या 'गदर- २' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. फक्त सनीच नाही तर संपुर्ण देओल कुटुंबीयांसाठी २०२३ हे वर्ष सर्वार्थाने खास ठरलं. सनीसह बॉबी देओलच्या 'अ‍निमल' आणि धर्मेंद्र यांच्या रॉकी रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमांनी धुमाकूळ घातला. 'गदर- २' आणि 'अ‍निमल' चित्रपटाच्या यशानंतर देओल ब्रदर्सच्या आयुष्यात भरभराटीचे दिवस आले. या संपुर्ण यशाचं श्रेय सनी देओल याने एका मुलीला दिलं आहे. 

अलिकडेच सनी आणि बॉबी देओल यांनी  'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघेही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी  सनीने त्याच्या बदलत्या काळाचे श्रेय त्याचा मुलगा करण देओलच्या पत्नीला म्हणजेच त्याच्या सुनेला दिले. तो म्हणाला,  ''मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. गोष्टी वर-खाली होत राहिल्या.  आमचे प्रयत्न सुरू होते. खूप काही करत होतो. पण अचानक जेव्हा माझ्या मुलाचं लग्न झालं. सून आमच्या घरी आली आणि त्यानंतर सारे वातावरणच बदलून गेलं'.

दरम्यान जून 2023 मध्ये सनीचा मुलगा करणने द्रिशा आचार्यसोबत लग्न केलं होतं. यानंतर जुलैमध्ये धर्मेंद्र यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये गदर 2 आला आणि डिसेंबरमध्ये बॉबी देओलचा 'ॲनिमल' प्रदर्शित झाला. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. धर्मेंद्र, सनी आणि बॉबी यांच्या कामाच खूप कौतुक झालं. 

टॅग्स :सनी देओलबॉबी देओलधमेंद्रसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाकपिल शर्मा