Join us

वाघाला सुई टोचली,बाई फारच शूर वीर आहेत; अमेयच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 16:35 IST

अमेयने या फोटोला एका आगळेवेगळे कॅप्शन दिले आहे.

अमेय वाघ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक आगळीवेगळी कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. अमेय अलीकडेच कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला. याचा फोटो अमेयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या हटके स्टाईलमध्ये फोटोला कॅप्शन दिलं. Vaccine 💉 घेतलं आणि फोटो टाकला नाही की antibodies रूसतात म्हणे ! Thank you असं कॅप्शन अमेयने या फोटोसोबत दिले आहे. अमेयने पुणे महानगर पालिकेचे देखील आभार मानले आहेत.

वाघाला सुई टोचली,बाई फारच शूर वीर आहेत, तुमच्या बरोबर लस घेण्याचा योग आल्याने anti bodies डबल खुश झाल्या अशा भन्नाट कमेंट्स चाहते अमेयच्या फोटोवर करतायेत. फोटो शेअर करताना

याआधी अमेयसह पुण्यातील काही कलाकार मंडळीने पुढाकार घेत पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुल येथे पोलिसांचं गुलाबपुष्प आणि सुरक्षा कीट प्रदान करत त्यांचं कौतुक केले होते.

यावेळी अमेय म्हणाला होता की, आमच्या आधीच्या पिढीतील माणसांनी वेगवेगळ्या प्रकारची संकटे पाहिली होती. मात्र, कोरोना हे आमच्या पिढीने आत्तापर्यंत पाहिलेलं सर्वात मोठं संकट आहे. पण या संकटात देखील राज्याचं संपूर्ण पोलीस दल ज्या हिरीरीने सर्वच पातळ्यांवर अहोरात्र लढा देत आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. आज आम्ही फक्त कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने पोलिसांविषयी आदर व्यक्त करण्याकरिता एकत्र जमलो आहोत.

टॅग्स :अमेय वाघ