Join us
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या पाठवणीवेळी अमेय वाघला अश्रू अनावर, अवघ्या चारच शब्दात सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:16 IST

अभिनेता अमेया वाघच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला.

प्रत्येक घरात भावांडांमध्ये कोणत्या ना कोणत्या, छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतो. भावा -बहिणींमध्ये कितीही भांडण किंवा वाद जरी झाला तरी शेवटी दोघांनाही एकमेकांची तितकीच काळजी असते ,चिंता असते. असंच गोड भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं अभिनेता अमेय वाघचं त्याच्या बहिणीसोबत आहे..

काही दिवसांपूर्वीच अभिनेता अमेया वाघच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला.  प्रत्येक भावासाठी बहिणीचं लग्न हे खास असतं आणि तितकच भावूक करणारं सुद्धा असंत. तसंच अमेयसाठीही होतं. अमेयनं बहिणीच्या लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलायं."बहिणीच्या लग्नातल्या आठवणी आणि किस्से .... किती सांगायचंय मला"..असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. अमेय बहिणीला किती मिस करतोय हे समजून येतंय.

अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. लवकरच अमेय 'झोंबिवली' सिनेमात दिसणार आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. 2021ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अमेय वाघ