Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय वाघला मिळाली ब्लू स्टिक!

By admin | Updated: February 15, 2017 02:55 IST

प्रत्येक कलाकारांसाठी प्रेक्षक ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती ही प्रेक्षकच देत असतात.

प्रत्येक कलाकारांसाठी प्रेक्षक ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती ही प्रेक्षकच देत असतात. त्यामुळे प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार आहेत. कलाकारांच्या कामाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी चाहतावर्ग असला की, कलाकारदेखील आत्मविश्वासाने काम करून यशाच्या मार्गाने वाटचाल करत असतात. असाच चाहतावर्ग सध्या अभिनेता अमेय वाघला भरभरून प्रेम देत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. होय, कारण अमेयला फेसबुक अकाऊंटला ब्लू स्टिक मिळाली आहे. त्यामुळे सध्या त्याची परिस्थिती आज मैं उपर, आसमा नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे... अशीच काहीशी झाली आहे. आपला हा चाहतावर्ग पाहता त्याने ही सोशल मीडियावर सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या टेक्निकल टीमचेही कौतुक केले आहे. अमेयला ब्लू स्टिक मिळाल्याने त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असल्याचे सोशल मीडियावरील शुभेच्छांवरून दिसत आहे.