Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगणाच्या "क्वीन" दिग्दर्शकाविरोधात छेडछाडीचा आरोप

By admin | Updated: April 6, 2017 14:14 IST

बॉलिवूडची धडाकेबाज अभिनेत्री कंगणा रानौतच्या "क्वीन" सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहल यांच्याविरोधात सहकारी महिलेनं छेडछाडीचा आरोप केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 6 - बॉलिवूडची धडाकेबाज अभिनेत्री कंगणा रानौतच्या "क्वीन" सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहल यांच्याविरोधात सहकारी महिलेनं छेडछाडीचा आरोप केला आहे. यामुळे फँटम फिल्मचे पार्टनर असलेले विकास बहल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 
 
"मुंबई मिरर"च्या बातमीनुसार, गोवा ट्रिपदरम्यान विकास बहलनं विनयभंग केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी फँटम फिल्म्सच्या मालकांनी एक समिती स्थापन केली आहे. अनुराग कश्यप, मधु मंटेना, विक्रमादित्य मोटवानी हे या कंपनीशी जोडले गेले आहेत. 
 
विनयभंगाच्या आरोपामुळे विकास बहल यांना 28 मार्च रोजी कंपनीतून बाहेर काढण्यात आले आहे. फँटम फिल्म्समधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार तर एकाच महिलेनं केली आहे, मात्र खरं तर विकासनं तीन जणींचा विनयभंग केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे बहल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. "कंपनीतील एचआरकडे माझ्याविरो