Join us
Daily Top 2Weekly Top 5

अलका याज्ञिक आणि त्यांच्या पतीचे एकमेकांवर प्रचंड प्रेम असूनही राहातात अनेक वर्षांपासून वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 18:54 IST

अलका याज्ञिक यांचे नीरज कपूर यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. पण त्यांच्यात काहीही भांडणं नसली तरी त्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहातात.

ठळक मुद्देनीरज आणि अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमन. लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे.

अलका याज्ञिक यांनी त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. त्यांनी पायल की झंकार या चित्रपटापासून त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्या केवळ १४ वर्षांच्या होत्या. तेजाब चित्रपटातील एक दो तीन या गाण्यामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी गायल्या आहेत. त्या बॉलिवूडचा एक भाग असल्या तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे.

अलका याज्ञिक यांचे नीरज कपूर यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना मुलगी देखील आहे. पण त्यांच्यात काहीही भांडणं नसली तरी त्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहातात. त्यामागे एक खास कारण आहे. अलका यांनी १९८९ साली नीरज कपूर यांच्यासोबत लग्न केले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. कुठल्या मतभेदामुळे वा वादामुळे नाही तर एका वेगळ्या कारणासाठी.

नीरज आणि अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील. अलका बॉलिवूडच्या दिग्गज गायिका तर नीरज बिझनेसमन. लग्नानंतर अलका मुंबईत राहायच्या तर नीरज हे त्यांच्या बिझनेसमुळे शिलाँगमध्ये राहायचे. अलका कामातून जसा वेळ मिळेल तशा शिलाँगला जात असत, तर कधी कधी नीरज मुंबईत येत. अनेक वर्षे हा 'सिलसिला' चालला. यादरम्यान त्यांच्या मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. अखेर अलका यांनीच पतीला शिलाँगला परत जाऊन आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आणि पुन्हा 'लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप' दोघांच्याही वाट्याला आले. तेव्हापासून नीरज आणि अलका वेगवेगळे राहतात. अर्थात त्यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. प्रेम आजही कायम आहे.

अलका याज्ञिक यांच्या मुलीचे नाव सायशा असून तिने तिचा प्रियकर अमित देसाईसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न केले. सायशाची आई ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका असल्या तरी सायशाला या करियरमध्ये रस नाहीये. तिचे अंधेरीत हॉटेल असून तिने आणि तिच्या बालमैत्रिणींनी मिळून हे हॉटेल सुरू केले आहे, तिने लंडन ऑफ स्कूल ऑफ मार्केटिंगमधून एमबीए केले आहे.

टॅग्स :अलका याज्ञिक