Join us

अलका कुबल करणार ‘कल्ला’

By admin | Updated: August 17, 2016 02:00 IST

अलका कुबल या आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अलका कुबल श्रीमंत दामोदरपंत या कॉमेडी चित्रपटात काही वर्षांपूर्वी झळकल्या होत्या

अलका कुबल या आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अलका कुबल श्रीमंत दामोदरपंत या कॉमेडी चित्रपटात काही वर्षांपूर्वी झळकल्या होत्या. या चित्रपटानंतर त्या पुन्हा एकदा एका कॉमेडी चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाविषयी अलका कुबल यांनी लोकमत सीएनएक्सला माहिती दिली. त्या सांगतात, केदार शिंदे दिग्दर्शित ‘कल्ला’ या चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि अंकुश चौधरी या तीन कलाकारांचा कल्ला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मीदेखील कॉमेडी भूमिका साकारली आहे. दिग्दर्शक केदार शिंदेसोबत माझा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.