Join us

आलियाचा मराठी टच

By admin | Updated: October 15, 2015 01:59 IST

सध्या चित्रपटांच्या प्रमोशनचे सगळीकडेच पेव फुटले आहे. मॉल्स, मालिका, मल्टीप्लेक्स थिएटर्स सगळीकडेच चित्रपटाचे जास्तीत जास्त प्रमोशन कसे करता येईल

सध्या चित्रपटांच्या प्रमोशनचे सगळीकडेच पेव फुटले आहे. मॉल्स, मालिका, मल्टीप्लेक्स थिएटर्स सगळीकडेच चित्रपटाचे जास्तीत जास्त प्रमोशन कसे करता येईल, याचे वेगवेगळे फंडे शोधत असतात. पण मराठी चित्रपटांचे मराठी मालिकेत जाऊन प्रमोशन करण्याचा प्रयोग तसा काहींनीच केला. यामध्ये ‘दुनियादारी’, ‘टाईमपास-२’ या काही चित्रपटांची नावे घेता येतील. हाच फंडा अवलंबलाय चक्क बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने...वाटलं ना आश्चर्य...पण हो, हे खरं आहे. आलियाचा आगामी चित्रपट ‘शानदार’साठी तिने ‘रुंजी’ या मराठी मालिकेत एन्ट्री घेतली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इतर वेळी आलियावरून कितीही जोक्स सोशल साईट्सवर येत असले, तरी मराठी सीरियलमधून चित्रपटांच्या प्रमोशनचा फंडा तिला नक्कीच यश देईल, हे काही वेगळे सांगायला नको. आता आलिया मराठी चित्रपटातही पदार्पण करणार का...याकडे सर्वांचे लक्ष आहे.