Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाने वाढवली फी

By admin | Updated: October 23, 2014 01:06 IST

महेश भट्टची मुलगी असल्याने बॉलीवूडमधील डावपेच आलिया भट्टला चांगलेच माहीत आहेत.

महेश भट्टची मुलगी असल्याने बॉलीवूडमधील डावपेच आलिया भट्टला चांगलेच माहीत आहेत. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आलियाने फ्लॉप चित्रपटांचे तोंड पाहिले नाही. तिच्या रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांना प्रेक्षकांनी बॉक्स आॅफिसवर भरभरून प्रेम दिले. आलियाची उपस्थिती जणू चित्रपटाच्या यशाची गॅरंटी बनली आहे. आता या संधीचा फायदा आलियालाही घ्यायचा आहे. त्यामुळेच तिने तिची फीस वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी एक निर्माता तिला साईन करण्यासाठी गेला, तेव्हा तिची फीस ऐकून त्याला चक्कर आली. आलियाची फीस कॅटरिना कैफपेक्षा थोडीशी कमी होती. त्या निर्मात्याने आलियाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आलिया मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. बॉलीवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी कलाकारांचे भाग्य पालटायला वेळ लागत नाही, हे आलियाला चांगलेच माहीत आहे.