Join us

‘डीअर जिंदगी’साठी आलियाने शूट केले गाणे!

By admin | Updated: July 16, 2016 01:30 IST

आलिया भट्ट सध्या दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘डीअर जिंदगी’साठी शूटिंग करत आहे. आलिया चार हीरोंसोबत रोमान्स करताना दिसणार आहे

आलिया भट्ट सध्या दिग्दर्शक गौरी शिंदे यांचा आगामी चित्रपट ‘डीअर जिंदगी’साठी शूटिंग करत आहे. आलिया चार हीरोंसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ते चार जण म्हणजे आदित्य रॉय कपूर, अली जफर, कुणाल कपूर आणि अंगद बेदी आहेत. शाहरूख खान चित्रपटात आलियाचा थेरपिस्ट म्हणून पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहे. आलिया त्या चारही जणांना डेटिंग करत असते. पण, ती कोणासोबत शेवटी रिलेशन ठेवते हा उत्सुकतेचा भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्यावर चौघांसोबतही डान्स करताना दिसेल. हे गाणे म्हणजे एक पार्टी सिक्वेन्स असून्,ा वेगवेगळ्या विचारांच्या चौघांसोबत ती रोमान्स करते. ‘लव्ह यू जिंदगी’ हे गाणे दक्षिण गोव्यात दोन दिवसांत शूट करण्यात आले आहे. शाहरूख खान याने तिला प्रेरणा देण्याचे काम यात केलेले दिसतेय. तो या गाण्याचा भाग नाही.