Join us

आलिया भट्टला बनवायचीय बायोपिक

By admin | Updated: October 14, 2015 02:45 IST

ने हमी वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या आणि नवनवीन आव्हाने स्वीकारायला तयार असणाऱ्या आलियाला आता नवीन काहीतरी करावे वाटत आहे

ने हमी वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या आणि नवनवीन आव्हाने स्वीकारायला तयार असणाऱ्या आलियाला आता नवीन काहीतरी करावे वाटत आहे. पाकिस्तानची सुप्रसिद्ध पॉप गायिका नाझिया हसन यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवायची आलियाची इच्छा आहे. नाझिया यांचे अल्पवयातच निधन झाले होते. या बायोपिकच्या माध्यमातुन एका अभिनेत्री म्हणून आपणा स्वत:ला जास्त चांगल्या प्रकारे सादर करू शकतो, असे आलियाला वाटते. याबाबत बोलताना ती म्हणाली, ‘या कल्पनेवर मी अजून जास्त विचार केलेला नाही. परंतू मी यावर लवकरच काम केले पाहिजे असे वाटते. नाझियाही गायिका आहेत आणि मी पण चांगल्या प्रकारे गाऊ शकते त्यामुळे यावर काम करणे मला जास्त इंटरेस्टिंग वाटते.’