Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्ट आहे युथ स्टाइल आयकॉन

By admin | Updated: January 20, 2017 02:31 IST

आलियाने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने एक बेंचमार्क निर्माण केला आहे.

आलियाने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने एक बेंचमार्क निर्माण केला आहे. अभिनयाबरोबरच तिचा फॅ शन सेन्सदेखील तेवढाच प्रसिद्ध आणि ट्रेंडी असतो. प्रत्येक चित्रपटात वेगळा लूक करणारी आलिया सार्वजनिक कार्यक्रमातही अत्यंत चांगला वॉर्डरोब कॅरी करते. सध्या तिच्या ‘डिअर जिंदगी’ लूकची फार चर्चा आहे. अनेक तरुणींमध्ये तिच्या या चित्रपटातील फॅशनला फॉलो करण्याची क्रेझ आहे. एकदम ‘इझी फील’ देणारे तिचे ड्रेस आजच्या मॉडर्न तरुणींचे प्रतिनिधित्व करतात. दैनंदिन वापरण्यास योग्य आणि तरी एलिगंट लूकसाठी ती फेमस आहे. मग तो प्रिंटेड फ्र ॉक असो किंवा पॉवरसुट किंवा वन शोल्डर ड्रेस. अशा प्रत्येक पोषाखात ती आकर्षक दिसते. रेड कार्पेटवर तर तिची अदाच न्यारी असते. अनेक वेळा तिच्या कपड्यांत ‘रिक्स फॅक्टर’देखील दिसून येतो. त्यामुळे वैविध्यपूर्ण अशी ती स्टाइल आयकॉन आहे.