Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टला जायचंय डेटवर..!

By admin | Updated: September 21, 2015 09:25 IST

आलिया भट्ट आणि शाहीद कपूर हे त्यांचा आगामी चित्रपट ‘शानदार’च्या प्रमोशनसाठी खूप व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान आलियाला मीठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला,

आ लिया भट्ट आणि शाहीद कपूर हे त्यांचा आगामी चित्रपट ‘शानदार’च्या प्रमोशनसाठी खूप व्यस्त आहेत. प्रमोशनदरम्यान आलियाला मीठीबाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, की तुमची ड्रीम डेट कशी असेल? यावर आलियाने उत्तर दिले, की मस्तपैकी तयार होऊन कँडललाइट डिनर करण्यापेक्षा घरीच पजामा घालून डेटवर जाणे पसंत करेन. तसेच माझा फेव्हरेट टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’ आणि ‘फ्रेन्ड्स’ पाहीन. मी शाकाहारी असल्याने माझ्या पार्टनरसोबत घरीच आरामात फेव्हरेट फूड पिज्जा, समोसे आणि चाट खाणे पसंत करेन. हीच माझी शानदार डेट असेल. त्यावर शाहीद म्हणाला, की म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांवर चाट आणि पिझ्झा फेकत राहणार.