Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी लेक 'राहा'ला 'या' नावाने हाक मारते आलिया भट; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:20 IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा ही कायमच चर्चेत असते.

अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध जोडपे. त्यांची लेक 'राहा' ही कायमच चर्चेत असते. पण अद्यापही रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. पण दोघे कायम लेक राहा हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. नुकतेच आलियाने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'राहा'च्या टोपण नावांचा खुलासा केला. 

आलिया भटने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ ठेवले होते. यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने राहाचे टोपणं नावं काय आहे असे विचारले की, यावर उत्तरात आलिया म्हणाली,  'राहू, रारा आणि लॉलीपॉप'. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या मुलीला या तीन नावांनी हाक मारतात.

नुकतेच राहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. ६ नोव्हेंबरला तिला एक वर्ष पुर्ण झाले आहे. आलिया आणि रणबीरने खास पद्धतीने लेकीचा वाढदिवस साजरा केला होता. आलियाने राहाची छोटीशी झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती. या फोटोंमध्ये राहा केक स्मॅश करताना दिसत होती.

 

आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर जून २०२२ मध्ये अभिनेत्रीने प्रग्नेंसीची घोषणा केली. तर आलियाने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केल्याचा निर्णय घेतला होता. 

 

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसेलिब्रिटीरणबीर कपूर