आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे. आलिया आणि रणबीर लग्न करणार अशी चर्चा सतत ऐकायला मिळते. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार 2020 च्या शेवटी दोघे लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. काही दिवसांपूर्वी आलियाने मुंबईतल्या जुहू परिसरात 13 कोटींचं आलिशान घरं खरेदी केलं त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर पकडला. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आलिया लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझायन केलेला लहंगा परिधान करणार आहे.
कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 11:09 IST
आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे.
कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}