Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया बनणार सौ. धोनी

By admin | Updated: December 16, 2014 23:09 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याची पत्नी साक्षीची भूमिका आलिया भट्ट निभावणार आहे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्याची पत्नी साक्षीची भूमिका आलिया भट्ट निभावणार आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या चित्रपटासाठी विराट कोहली, जहीर खान, जोगिंदर शर्मा यांच्या भूमिकांसाठीही अभिनेत्यांची निवड केली आहे. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या नावाने बनत असलेल्या चित्रपटात धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत करणार आहे. खुबसुरत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानी अभिनेता फवाद खान चित्रपटात विराट कोहलीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. नीरज पांडे यांनी जहीर खानच्या भूमिकेसाठी गौतम गुलाटी आणि जोगिंदर शर्माच्या भूमिकेसाठी आफताब शिवदासानीची निवड केली आहे. इशांत शर्माच्या भूमिकेसाठी जॉन अब्राहमच्या नावाची चर्चा होती; पण त्याने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.