Join us

Death Of The Nile Trailer : अली फजलच्या वंडर वुमनसोबतच्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 13:52 IST

अलीने ट्रेलर शेअर करत लिहिले की, मर्डर तर सुरूवात होती. या मजेदार लोकांसोबत काम करून फार मजा आली. डेथ ऑन द नील ए प्रवास होता. हा सिनेमा २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अभिनेता अली फजलचाहॉलिवूड सिनेमा 'डेथ ऑन द नील' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमातील स्टारकास्ट पाहून प्रेक्षकही या सिनेमासाठी फार उत्सुक आहेत. अली पहिल्यांदा वंडर वुमेन अभिनेत्री गॅल गॅडॉटसोबत काम करणार आहे. अलीने ट्रेलर शेअर करत लिहिले की, मर्डर तर सुरूवात होती. या मजेदार लोकांसोबत काम करून फार मजा आली. डेथ ऑन द नील ए प्रवास होता. हा सिनेमा २३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अलीसोबतच या सिनेमात वंडर वुमन म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री गॅल गॅडॉटची महत्वाची भूमिका आहे. तसेच ब्लॅक पॅंथरमध्ये दिसलेली लिटिशिया राइट आणि नेटफ्लिक्सची वेबसीरीजी सेक्स एज्युकेशनमधील अभिनेत्री एमा मॅकी यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाची कथा इजिप्तच्या नील नदीवर प्रवास करत असलेल्या एका क्रूझच्या अवतीभवती फिरते. या क्रूझवर एक हत्या होते. त्यानंतर कथा पुढे सरकते.

या सिनेमाचं दिग्दर्शन केनेथ ब्रॅनेगने केलं आहे. तर स्क्रीनप्ले मायकल ग्रीनने लिहिला आहे. हा सिनेमा प्रसिद्ध लेखिका अगाथा क्रिस्टीच्या १९३७ मध्ये आलेल्या कादंबरीवर आधारित आहे. दरम्यान याच अलीची महत्वाची भूमिका असल्याने त्याचे फॅन्स हा सिनेमा रिलीज होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. दरम्यान मिर्झापूर शोमधून जबरदस्त लोकप्रियता मिळाल्यावर या शोच्या सीझन २ बाबत लोक विचार आहेत. तसेच को रिचा चड्ढासोबत लग्नावरूनची चर्चेत आहे. 

टॅग्स :अली फजलहॉलिवूड