अक्षय कुमारने ‘७२ मैल एक प्रवास’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आपली दखल घ्यायला लावली होती. त्यामुळे त्याचा पुढचा चित्रपट कधी येईल याची उत्सुकता जास्त होती. अखेर अक्षय कुमारनेच याबाबत आपले मौन सोडले आहे. त्याची निर्मिती असलेला 'दादा’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०१६ला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन करणार आहे तो संजय जाधव. मात्र चित्रपट नेमका कोणावर आहे, हे अक्षयने गुलदस्त्यात ठेवले आहे.
अक्षयचा मराठी 'दादा’
By admin | Updated: June 12, 2015 23:26 IST