Join us

पाठकबाई लग्नासाठी तयार ! नवीन व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारलं, काय मग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 10:09 IST

अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे.

राणादा आणि पाठकबाईची जोडी सध्या चर्चेत आहे. ही जोडी लग्नबंधनात जे अडकणार आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतुन पाठकबाई आणि राणादाने सर्वांनाच आपलेसे केले होते. ही टीव्हीवरची जोडी खऱ्या आयुष्यातही आहे हे कळल्यावरच चाहते केवढे खुश झाले. सध्या यांच्याकडे लगीनघाई सुरु असुन, मला नववधूच्या वेशात बघायला तयार आहात ना असे अक्षया विचारतीये.

अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे. त्याला तिने कॅप्शन दिले आहे,  मला नवरीच्या रुपात बघायला तयार आहात ना ?'

या व्हिडिओवर लगेच चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'हो आम्ही तयार आहे, खुप छान दिसत आहात' असे म्हणत अक्षयाला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचे लग्न कधी होणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. लवकरच असे तिने पोस्ट मध्ये लिहिले आहे मात्र तारीख अजुन सांगितलेली नाही. त्यामुळे या दोघांना वर वधू च्या वेशात बघण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीमराठी अभिनेतामराठीतुझ्यात जीव रंगला