Join us

अक्षय - रितेशचा हाऊस'फुल' टाईमपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2016 09:36 IST

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार रितेश देशमुखसोबत टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये दोघेही फुल टाईमपास करताना दिसत आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - टेबल टेनिस खेळत असालं आणि तुमच्याकडे बॉलच नसेल तर काय कराल ?..साहजिकच तुम्ही खेळणार नाही. पण बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि रितेश देशमुखला याचा काही फरक पडताना दिसत नाही. नुकताच अक्षय कुमारने रितेश देशमुखसोबत टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही फुल टाईमपास करताना दिसत आहेत. महत्वाचं म्हणजे बॉल नसतानादेखील दोघेही काल्पानिक टेबल टेनिस खेळत धमाल करत आहेत. फक्त बॉलचा आवाज ऐकू येत आहे. 
 
अक्षय कुमार आणि रितेश देशमुखचा हाऊसफुल 3 चित्रपट येत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन कऱण्यासाठी अक्षयने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अक्षयने 'हाऊसफुल स्टाईलने टेबल टेनिस खेळत आहोत, तुम्ही बॉल शोधू शकता का ? असं ट्टिट केलं आहे. साजीद - फरहाद या जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अक्षय आणि रितेशसोबत या चित्रपटात अभिषेक बच्चन, जँकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखऱी आणि लिसा हेडनदेखील प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. 3 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.