Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय-नीरज पुन्हा एकत्र येणार

By admin | Updated: November 20, 2015 02:37 IST

‘स्पे शल २६’ आणि ‘बेबी’मध्ये अक्षय कुमार आणि नीरज पांडे यांनी एकत्र काम केले आहे. ते आता पुन्हा ‘रुस्तुम’च्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट

‘स्पे शल २६’ आणि ‘बेबी’मध्ये अक्षय कुमार आणि नीरज पांडे यांनी एकत्र काम केले आहे. ते आता पुन्हा ‘रुस्तुम’च्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असून, नीरजने कथा लिहिली आहे. पुढील वर्षासाठीचे सर्व देशभक्तीपर दिवस अक्षय कुमारने बुक केले आहेत. प्रजासत्ताक दिवसाच्या विकेंडला ‘एयरलिफ्ट’, ‘रुस्तुम’ १२ आॅगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या विकें डला रिलीज होणार आहेत. चित्रपटाची शूटिंग युकेमध्ये सुरू होणार आहे. दोन तरुण अभिनेत्री त्याच्यासोबत काम करणार आहेत. शूटिंगसाठी १९५०चा सेट उभारण्यात येणार आहे. युरोप, भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध ठिकाणी त्याचे शूटिंग होणार आहे. चित्रपटासाठी अक्षयच्या लूकवर काम केले जात आहे.