Join us  

छप्परफाड! ‘Sooryavanshi’ने दुसऱ्या दिवशीही केली बंपर कमाई, दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 10:16 AM

Sooryavanshi Box Office Collection Day 2: होय, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये आणि ‘सूर्यवंशी’ पाहायला चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत

अक्षय कुमार (Akshay Kumar) व कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर ‘सूर्यवंशी’ने चित्रपटगृहांना नवसंजीवनी दिली आहे. होय, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये आणि ‘सूर्यवंशी’ पाहायला चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी ‘सूर्यवंशी’ने दोनच दिवसांत अगदी ‘छप्परफाड’ कमाई (Sooryavanshi Box Office Collection Day 2) केली आहे.

पहिल्या दिवशी रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ने बंपर कमाई केली. शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी 26 कोटींचा गल्ला जमला. दुसऱ्या दिवशीही सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी ‘सूर्यवंशी’ने 24.50 कोटींचा बिझनेस केला. पहिल्या दिवशीच्या तुलनेत कमाईचा आकडा कमी आहे. पण दोन दिवसांत चित्रपटाने 50 कोटींचा पल्ला गाठला आहे आणि आज रविवारी ‘सूर्यवंशी’ आणखी चांगला बिझनेस करण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाची खरी परीक्षा मात्र बुधवार आणि गुरूवारी होईल. बुधवार, गुरूवारी सुट्टी संपल्यानंतर आणि दिवाळीचा मूड ओसल्यानंतर हा चित्रपट किती चालतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

 दिवाळीच्या सुट्टींचा फायदा या चित्रपटाला मिळतोय. शिवाय कोरोना महामारीमुळे सुमारे 2 वर्ष चित्रपटगृह बंद होती. ती उघडल्याने सिनेप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहतोय. कोरोना महामारीनंतर रिलीज झालेला ‘सूर्यवंशी’ पहिला बिग बजेट सिनेमा आहे. त्याचा लाभही चित्रपटाला मिळतोय.‘सूर्यवंशी’ भारतातील सुमारे 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. विदेशातही 1300 स्क्रिन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारकतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. रणवीर सिंग व अजय देवगण कॅमिओ रोलमध्ये आहेत. याशिवाय गुलशन ग्रोव्हर, सिकंदर खेर, अभिमन्यू सिंग, जावेद  जाफरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमारकतरिना कैफ