Join us  

पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसते अक्षय कुमारची ही हिरोईन, बाथटबमधला व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 6:00 AM

फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

The Internet With Her Video:  बॉलिवूडमध्ये चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक अभिनेत्री पाऊल ठेवतात. यातील काही यशस्वी होतात, तर काही पडद्यापासून दूर राहतात. यापैकी एक नाव आरती छाब्रिया(Aarti Chabria).  आज पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

२००२ मध्ये रिलीज झालेल्या'आवारा पागल दीवाना' हा चित्रपटात आरती अक्षय कुमारची होराईन होती. आज जरी ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा बाथटबमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 2002 ते 2010 या काळात आरती चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय होती.

'तुमसे अच्छा कौन है' मधून तिने करिअरला सुरुवात केली. याशिवाय ती 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. आरतीने मॅगी नूडल्स, पेप्सोडेंट टूथपेस्ट, क्लीन अँड क्लियर फेस वॉश, अमूल फ्रॉस्टिक आइस्क्रीम आणि क्रॅक क्रीम यासह अनेक ब्रँडची जाहिरात केली आहे.आरतीने नशा ही नशा है, हॅरी आनंदच्या चाहत आणि अदनान सामीच्या गाण्यातील म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे.

हिंदी व्यतिरिक्त आरतीने कन्नड, तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकंच नाही तर ती अनेक टीव्ही रिअॅलिटी शोचा भागही आहे. यामध्ये 'खतरों के खिलाडी', 'झलक दिखलाजा' आणि 'डर सबको लगता है' सारख्या शोच्या नावांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, आरतीने 2018 साली ऑस्ट्रेलियात काम करणार्‍या विशारदशी लग्न केले.

आरती टीव्ही सीरियल 'डर सबको लगता है' च्या एका एपिसोडमध्येही दिसली आहे.1 एप्रिल 2017 रोजी, आरती छाब्रियाने मुंबई वाराणसी एक्सप्रेस या लघुपटातून दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कारही जिंकली आहेत. 

 

 

टॅग्स :आरती छाबरियाअक्षय कुमारबॉलिवूड