Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजयचा रोमँटिक अंदाज

By admin | Updated: September 23, 2016 02:54 IST

अजय देवगन आपला आगामी चित्रपट ‘शिवाय’मध्ये रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे ‘दर्खास्त’ची एक झलक नुकतीच समोर आली.

अजय देवगन आपला आगामी चित्रपट ‘शिवाय’मध्ये रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे ‘दर्खास्त’ची एक झलक नुकतीच समोर आली. त्यामधील बोल ऐकून आपणही आपल्या प्रेमाच्या आठवणीत रममाण होतो. ‘इस कदर तू मुझे प्यार कर, जिसे कभी ना मैं सकूँ फिर भुला. जिंदगी लाई हमें यहाँ, कोई इरादा तो होगा भला...’ सुनिधि चौहानच्या आवाजात गीताचे हे प्रेमळ बोल व गिटारची सुरेल धून गाण्याला रोमँटिक बनवते. गाण्याच्या पोस्टरमध्ये अजय देवगन अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे. चित्रपटाचे हे रोमँटिक गाणे लवकरच रिलीज होणार होणार आहे. अजय देवगनने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हा चित्रपट 28 आॅक्टोबरला रिलीज होत आहे.