Join us

अजय देवगणचा ‘शिवाय’ वांद्यात?

By admin | Updated: May 28, 2016 02:01 IST

होय, अजय देवगण अभिनीत ‘शिवाय’ हा चित्रपट रीलीज होण्याआधीच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. काही चित्रपट रीलीजनंतर तर काही रीलीजपूर्वीच वांद्यात सापडतात

होय, अजय देवगण अभिनीत ‘शिवाय’ हा चित्रपट रीलीज होण्याआधीच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. काही चित्रपट रीलीजनंतर तर काही रीलीजपूर्वीच वांद्यात सापडतात. ‘शिवाय’ रीलीजआधीच वांद्यात सापडला आहे. चित्रपटाच्या एका पोस्टरने वाद ओढावला आहे. दिल्लीच्या एका वकिलाने अजय व त्याच्या चित्रपटाच्या डायरेक्टोरियल क्रूविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवायच्या एका पोस्टरमध्ये अजय भगवान शिवाच्या आकृतीवर जोडे घालून चढत असताना दाखवले आहे. या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे या वकिलाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.