Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल ऑनलाईनमधील ऐश्वर्या आहे माझ्या नवऱ्याची बायकोमधील या अभिनेत्याची पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 15:13 IST

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.

ठळक मुद्देअभिजीत हा समीधाचा पती असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

शुभमंगल ऑनलाईन या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत सुयश टिळक, सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेत समीधा गुरू एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या ऐश्वर्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. 

समीधाने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. तुम्हाला माहीत आहे का, समीधाचा नवरा देखील अभिनेता असून झी मराठीवर सध्या सुरू असलेल्या एका मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत गुरू म्हणजेच अभिजीत खांडेकरच्या मित्राच्या भूमिकेत एका अभिनेत्याला आपल्याला पाहायला मिळते. गॅरीला विविध आयडिया देण्याचे काम त्याचा हा मित्र करत असतो. हाच मित्र म्हणजे अभिनेता अभिजीत गुरू आहे. अभिजीतचे या मालिकेतील काम प्रेक्षकांना चांगलेच आवडते. 

अभिजीत हा समीधाचा पती असून त्या दोघांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. दूरचिवाहिन्यांवर गाजलेल्या विविध मराठी मालिकांचे संवाद आणि पटकथा अभिजीत गुरूने लिहिल्या आहेत. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला लेखक आहे. 

अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. त्यानंतर ‘कशाला उद्याची बात’, ‘अनामिका’, ‘लज्जा’, ‘झुंज’, ‘आभास हा’, ‘देवयानी’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘क्राइम डायरी’, ‘माझिया माहेरा’, ‘लक्ष्य’ आदी विविध मालिकांचे पटकथा लेखन गुरूने केले. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचे पटकथा लेखन त्याने केले होते. याच मालिकेद्वारे तो अभिनयक्षेत्राकडे वळला. 

टॅग्स :समिधा गुरूमाझ्या नवऱ्याची बायको