Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: ऐश्वर्यालाच हवा होता ‘बोल्ड रोल’

By admin | Updated: October 7, 2016 04:51 IST

खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिलाच ‘ऐ दिल है मुश्किल’मधील बोल्ड भूमिका हवी होती. होय, ऐकताय ते खरे आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये

खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिलाच ‘ऐ दिल है मुश्किल’मधील बोल्ड भूमिका हवी होती. होय, ऐकताय ते खरे आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या बोल्ड अवतारात दिसणार आहे. ‘सरबजीत’ आणि ‘जज्बा’नंतर ऐशला अशा हॉट अवतारात पाहणे खरे तर अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. पण हा स्वत: ऐशचा निर्णय होता. सूत्रांचे मानाल तर, ‘ऐ दिल है मुश्किल’साठी ऐश्वर्याला विचारणा झाली तेव्हा मेकर्सनी फारशी बोल्ड नसलेली स्क्रीप्ट तिला दिली. पण ही स्क्रीप्ट वाचल्यानंतर यात काहीतरी कमतरता असल्याचे ऐश्वर्याला जाणवले. आपल्या भूमिकेत जीवच नाही आहे, असे तिला वाटले. यानंतर ऐश्वर्याने मेकर्सला ही भूमिका अधिक बोल्ड करण्याची गळ घातली. तसे केले तरच ही भूमिका खऱ्या अर्थाने पडद्यावर प्रभावी ठरेल, असे ऐशचे मत होते. यानंतर केवळ ऐश्वर्याच्या आग्रहाखातर ‘ऐ दिल...’मधील तिची भूमिका अधिक बोल्ड करण्यात आली.‘ऐ दिल...’च्या स्क्रीप्टवर अधिक काम केले गेले.