Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या नारकरचा श्रीवल्ली लूक व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 18:34 IST

Aishwarya Narkar:सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या यांनी नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यावर काही मनमोहक स्टेप्स करताना दिसत आहे.

वय हा केवळ आकडा असतो हे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं. वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या यांनी स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. यातच ऐश्वर्या कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असून त्या ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. यावेळी त्यांनी श्रीवल्लीच्या गेटअपमध्ये एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या यांनी नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' या गाण्यावर काही मनमोहक स्टेप्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी दाक्षिणात्य स्टाइलप्रमाणे पेहरावदेखील केला आहे. 

दरम्यान, ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कमालीच्या अॅक्टीव्ह असून त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकण्यास त्या यशस्वी ठरल्या आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीसिनेमापुष्पा